तालुक्यातील उपदेश दुमाला येथील वखारिया विद्यालयांमध्ये विज्ञान प्राविण्य स्पर्धा परीक्षा इयत्ता नववी व इयत्ता सहावी या वर्गासाठी तर गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या वर्गासाठी घेण्यात आली.
विज्ञान प्रविण्य स्पर्धेमध्ये इयत्ता ९ वीतून प्रथम क्रमांक कुमारी तेहनियत मकबूल बागवान, द्वितीय क्रमांक साक्षी सतीश कावरे व तृतीय क्रमांक श्रद्धा प्रेमनाथ माने. सहावीतून प्रथम अथर्व समाधान शिंदे, द्वितीय निल चव्हाण
गणित संबोध परीक्षेत इयत्ता पाचवीतून प्रथम क्रमांक समृद्धी बुरगुटे, द्वितीय क्रमांक राजनंदिनी बुरगुटे, तृतीय क्रमांक राजवीर डोंगरे तर इयत्ता आठवीतून प्रथम क्रमांक विराज ठोंगे, द्वितीय क्रमांक गीतांजली जुनवणकर, तृतीय क्रमांक राधिका पवार
या परीक्षेसाठी मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक म्हणून अनिल वैद्य, मकरंद जगदाळे व रेवणसिद्ध दुलंगे, यश पवार यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 34