सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT), सोलापूर येथील WIT जैन मंदिराच्या वतीने आयोजित पर्युषण महापर्वाची सांगता शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. अभिषेक, पूजन, आरती, भक्ती-संध्या, भक्ताम्बर पाठ, लघुप्रतिक्रमण आणि प्रवचनासह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी या सोहळ्याला धार्मिक व सांस्कृतिक रंगत लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान महावीर आणि १०८ आचार्य श्री शांतिसागर महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून वंदन करण्यात आले. डब्ल्यू.आय.टी.चे माजी विद्यार्थी तथा ब्रह्मचारी साकेतभैया यांच्या आशीर्वचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, वैभव गांधी, पराग शहा यांच्यासह गांधी परिवार, शहा परिवार, सोलापुरातील प्रतिष्ठित जैन बांधव तसेच वालचंद शिक्षण समूहातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात मृणाली वाडकर, संस्कृती मुकीवार आणि रिया केटकाळे यांच्या मंगलाचरणाने झाली. कार्तिकी जैन यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. श्रद्धा वानरे, साक्षी अक्कीवाटे, रश्मीका शहा, सायली उमाठे, आस्था बिराज आणि नम्रता जैन यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सेजल दराडा, तेजश्री बंड आणि सानिका पाटील यांनी समन्वयाची जबाबदारी सांभाळली, तर आंशिका जैन यांनी मार्गदर्शन केले.
आचार्य श्री शांतिसागर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित भारूडातून अभिषेक पाटील, जयेश यंबल, यश काळे, प्रज्योत वाडेवाले, यश बुकशेट, चिन्मय जैन, अजय मोहेकर, प्रणव जैन, ओम मोरसकर, ऋषिकेश कोईक, पूर्वा भाकरे, अवंतिका बन्नोरे, समृद्धी बांगडे, तन्वी कान्हेड आणि दिशा काळे यांनी धार्मिक विचार, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे मांडला.
नृत्यनाटिकेत स्मृती जामसंडेकर, मनाली वारुळ, संयुक्ता हिरेप, अनुजा पाटील, माहेश्वरी शेटे आणि श्रद्धा कोंडेकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या भावमुद्रा, नृत्याविष्कार आणि अभिनयातून पर्युषण पर्वाचा आध्यात्मिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
या नृत्यनाटिकेचे समन्वयक म्हणून सिद्धी श्रीसागर आणि दिशा शेंते यांनी जबाबदारी सांभाळत विद्यार्थिनींच्या सादरीकरणाला सुंदर आकार दिला. धार्मिक आशय, नृत्य, अभिनय आणि संगीत यांचा सुरेख मिलाफ झाल्याने नृत्यनाटिकेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
‘मोह से मोक्ष की ओर – आत्म विजय की अमर कहानी’ नाटिकेतून आत्मविजयाचा संदेश
‘मोह से मोक्ष की ओर – आत्म विजय की अमर कहानी’ या नाटिकेतून भगवान आदिनाथ, भरत आणि बाहुबली यांच्या जीवनातील विविध प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आले. या नाटिकेतून ज्ञान, विवेक, कर्तव्य, अहिंसा, वैराग्य, मोहत्याग आणि आत्मविजयाचा संदेश देण्यात आला.
नाटिकेत जिनेंद्र वाडेवाले, प्रसन्न डोंगरे, अविनाश थेरे, पारस मोरस्कर, निलेश दोशी, तन्मय रामढवे, सम्यक सोईतकर, चिन्मय कनवाडे, दिव्यांश जैन, अर्णव पाटील, तीर्थ जैन, अभिषेक वायकोस, सृष्टी कोले, शर्वरी चौगुले, शर्वरी पनवेलकर, देशना एखंडे, दिव्या अहाळे, त्विशा दोषी, पर्याप्ती पापडीवाल आणि धीरज रायसोनी यांनी विविध भूमिका साकारल्या.
श्रुती मगदूम, दिशिता जैन, रिद्धी विटाळकर, धीरज रायसोनी आणि अक्षय पाटणी यांनी ज्येष्ठ सहभागी व मार्गदर्शक म्हणून योगदान दिले. श्रेयांस बाफना, दिया लोढा, तुषार डोळस आणि आकाश मोदी यांनी नाटिकेच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या वारल, स्वरांजली काळे, समृद्धी खरावणे, समीक्षा पाटील, जिनेशा संचेती, आदेश गंगवाल, रोहित अजमेरा, नयन पेटकर, अथर्व परमाज आणि अथर्व थेरे यांनी केले. देवश्री एखंडे, जान्हवी जैन, श्रद्धा घेवारी, फलेश जैन, क्षितिज शहा आणि तनिषा सुराणा यांनी मार्गदर्शन केले. तन्वी कान्हेड, यश बुकशेट आणि शैलेश खोत यांनी सूत्रसंचालनाच्या समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमांमधून पर्युषण महापर्वातील आत्मशुद्धी, संयम, अहिंसा, त्याग आणि आत्मविजयाचे मूल्य प्रभावीपणे अधोरेखित झाले. धार्मिक वातावरणात रंगलेल्या या सांस्कृतिक मैफलीने उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि कलाविष्काराचा सुंदर अनुभव दिला.
























