बार्शी – पुणे विभागातील तालुका स्तरीय शालेय योगासन स्पर्धेत जिजाऊ गुरुकुलचा विद्यार्थी प्रथमेश जयवंत शिंदे याने आपल्या उत्कृष्ट योग कौशल्याचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
१९ वर्षे वयोगटात प्रथमेश शिंदे याने आर्टिस्टिक योगा प्रकारात प्रथम क्रमांक तर ट्रेडिशनल योगा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. आपल्या सातत्यपूर्ण सरावाच्या, मेहनतीच्या आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने ही दुहेरी कामगिरी केली आहे.
या उल्लेखनीय यशामुळे सोलापूर जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी प्रथमेश शिंदेची निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे जिजाऊ गुरुकुलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, गुरुकुलातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रथमेशच्या या यशाबद्दल जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा वर्षाताई घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच मेजर जे. बी. शिंदे तसेच जिजाऊ गुरुकुलचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 16