Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाड कमिटी अंतर्गत नोकरीसाठी प्रशासकीय इमारतीवर चढून तरुणाचा टोकाचा प्रयत्न

तरुण भारतbyतरुण भारत
September 21, 2026
in solapur
0
लाड कमिटी अंतर्गत नोकरीसाठी प्रशासकीय इमारतीवर चढून तरुणाचा टोकाचा प्रयत्न
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महापालिकेतील लाड कमिटी अंतर्गत वारसा हक्काच्या नोकरीसाठी नियुक्ती पत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून एका अर्जदार तरुणाने आज महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापालिका आवारात एकच खळबळ उडाली. दरम्यान,मनपा अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि कामगार नेत्यांनी समजूत काढून सुरक्षित खाली आणले. यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान  मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी संबंधित अर्जदारास नियुक्ती आदेश देण्यात येणार असल्याचे उपायुक्त सोनाली यादव यांनी स्पष्ट केले आहे.
          बुद्धभूषण प्रदीप कांबळे (रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) असे त्या अर्जदार तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी 11.30 सुमारास प्रशासकीय इमारतीवर जाऊन या तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. प्रशासकीय इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर चढल्याचे पाहून आवारात एकच खळबळ उडाली. बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. महापालिका अग्निशामक दल आणि ॲम्बुलन्सही दाखल झाली होती. माहिती मिळताच तत्काळ अतिरिक्त आयुक्त वीणा पवार उपायुक्त सोनाली यादव या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव, नगरसेवक गौतम कसबे यांनीही प्रशासकीय इमारतीवर जाऊन संबंधित बुद्धभूषण कांबळे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ऑडिटसह सर्व प्रक्रिया पार पाडूनही  नियुक्ती आदेश देण्यास महापालिका सामान्य प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. उपस्थित कामगार नेते आणि नगरसेवक यांनी मध्यस्थी करून त्या युवकाची समजूत काढली.अखेर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष  बापूसाहेब सदाफुले यांनी मध्यस्थी करून कांबळे यांची समजूत काढली आणि त्यांना सुरक्षित खाली उतरवले.
         या प्रकरणी ऑडिट होऊन नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला असतानाही पुढील कार्यवाही रखडल्याने कांबळे यांना गेल्या काही काळापासून महापालिकेचे हेलपाटे मारावे लागत होते. अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, बुद्धभूषण कांबळे यांची अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याशी चर्चा झाली. यावेळी लाड कमिटी वारसा हक्काच्या नियुक्तीचा विषय तातडीने मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. ऑडिट प्रक्रिया पूर्ण झालेली असून प्रकरणातील कागदपत्रे नियमानुसार असल्याचे लक्षात घेऊन शासकीय नियमांनुसार तातडीने नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन दिले आहे.
आज मंगळवारी सायंकाळपर्यंत
 नियुक्ती आदेश देणार : उपायुक्त यादव
सन 2024 मध्ये बुद्धभूषण प्रदीप कांबळे यांनी लाड कमिटी अंतर्गत महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर 2025 मध्ये याच पदासाठी आणखी एक अर्ज कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीकडून दाखल झाला होता. संबंधित सेवकाने हयात असतानाच बुद्धभूषण कांबळे यांना नॉमिनी केले होते. सेवा पुस्तक पाहणे आणि इतर दुसरा अर्ज निकाली काढून नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू होती. सेवा पुस्तक पडताळणी करून पुन्हा ऑडिट करण्याचा शेरा होता. फायनल ऑडिट राहिले होते. दरम्यान, एसआयआर या अभियानामुळे कर्मचारी अधिकारी गुंतल्याने प्रशासकीय विलंब झाला. आयुक्तांची मंजुरी घेऊन मंगळवारी सायंकाळपर्यंत संबंधित बुद्धभूषण कांबळे यांना नियुक्ती आदेश देण्यात येईल अशी माहिती महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी सांगितले. एकाच पदासाठी इतर अर्ज दाखल झालेल्या प्रकरणांवर दर बुधवारी सुनावणी घेतली जात असल्याचेही यादव यांनी स्पष्ट केले.
 प्रतीक्षा यादी अंतिम करा : अशोक जानराव
सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष तथा कामगार नेते अशोक जानराव यांनी वारसा हक्काच्या सर्व अर्जांची शहानिशा करून पात्र उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची मागणी केली. यादी अंतिम होईपर्यंत नियुक्त्या देऊ नयेत, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच कोणत्याही वारसदाराने टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आकृतीबंधामध्ये या पदांची
तरतूद करावी : बापूसाहेब सदाफुले
महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी बुद्धभूषण कांबळे यांच्यासह सर्व वारसदारांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. वारसदारांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा द्यावा असे आवाहन करताना प्रशासनाने आकृतीबंधामध्ये या पदांची तरतूद करावी आणि सर्वांना नियुक्ती द्यावी. तातडीने या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी बापूसाहेब सदाफुले यांनी केली.
Post Views: 21
Previous Post

मध्य रेल्वे विभागाअंतर्गत रेल्वे आस्थापनांमध्ये स्वच्छता जनजागृती

Next Post

मध्य रेल्वेची ‘कवच ४.०’ ची पहिली चाचणी यशस्वीरित्या संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मध्य रेल्वेची 'कवच ४.०' ची पहिली चाचणी यशस्वीरित्या संपन्न

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243407

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!