बार्शी – तालुक्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले आहे. पाऊस नसल्याने येथील पिकांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.
बार्शी तालुक्यातील धानोरे येथील महिला शेतकरी दमयंती साहेबराव गादेकर यांच्या सुमारे ५ हेक्टर क्षेत्रात पावसाअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २३) केली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
धानोरे येथील गादेकर यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीनचे पीक करपून गेले असून त्या पिकास शेंगाही लागल्या नाहीत. ५० दिवस पाऊस नसल्याने संपूर्ण पीक वाया गेले आहे. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी सुमारे ५ लाख रुपयाचे नुकसान, झाल्याचे वंदना गादेकर यांनी सांगितले. यावेळी धानोरे येथील वृद्ध महिला शेतकरी दमयंती गादेकर यांच्यासह त्यांच्या मुली वंदना गादेकर, संध्या गरड यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री
्मु्ख्य्मं देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशिवच्या जि. प. अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेएन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ. आर. शेख, कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बार्शीच्या तालुक्याच्या क्षेत्रात सुमारे ९० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यातील सर्वच सोयाबीनची अवस्था खूपच वाईट झाली आहे. पाऊस नसल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. येथे दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार म्हणून आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना मदतीबाबत सरकार येत्या दोन दिवसात अध्यादेश काढणार असून, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, आणि अन्नधान्य वितरणाबाबत शासनाकडून सर्व मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
Post Views: 8