सोलापूर – सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी विद्यार्थी पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड ,प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री दुर्गे एस . ए.उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रशालेत राबविले जाणारे सर्व उपक्रम विषयी माहिती प्रशालेतील सहशिक्षक श्री.मेहता आर.आर.यांनी सांगितले. नियमित ज्यादा तास,विद्यार्थी गैरहजर व जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी पालक या नात्याने आपली भूमिका काय असावी याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री यादवाड.आर.वाय यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भांजे डी.बी तर आभार श्री बगले एस.एम.यांनी मानले.
Post Views: 13