बार्शी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा बॉक्सिंग समन्वयक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलापूर जिल्हा शालेय ग्रामीण बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत जिजाऊ गुरुकुल, खांडवीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्यपदकांची कमाई केली.
या स्पर्धेत सिद्धार्थ बोराडे याने ३८ ते ४० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले. तसेच स्वप्निल अंधारे याने ४८ ते ५० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मिळवलेले हे यश जिजाऊ गुरुकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे. त्यांच्या या यशामागे असलेली मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांचे योगदान कौतुकास्पद आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक संभाजी घाडगे, सचिवा वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, जे. बी. शिंदे मेजर, क्रीडा विभाग प्रमुख गणेश वडेकर तसेच शाळेतील सर्व क्रीडाशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सिद्धार्थ बोराडे व स्वप्निल अंधारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 5