बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवास उद्या सोमवारपासून श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये मोठ्या जल्लोषात प्रारंभ होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील एकूण दोन हजार कलावंत विद्यार्थ्यांचा ३९ कलाप्रकारांतून सहभाग राहील असे यजमान श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी सांगितले.
महोत्सवात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उद्घाटक म्हणून उपस्थित असतील. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर असतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रापासून विविध स्पर्धांना प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी असेल लावणी, समूहगायन (भारतीय), कातरकाम, मूक अभिनय, प्रश्नमंजुषा लेखी, वक्तृत्व मराठी, भारुड, भित्तीचित्रण, काव्यवाचन, एकांकिका, मेहंदी, भजन या कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
चार दिवस असणार कलारंगाची उधळण
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून दोन हजार विद्यार्थ्यांचा असेल सहभाग
श्री शिवाजी महाविद्यालय येथे युवा महोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. भव्य वॉटरप्रुफ मंडप उभा केला आहे. उत्तम ध्वनी प्रकाशयोजनेसह प्रेक्षकांसाठी उत्तम बैठक व्यवस्था केली आहे.
आज युवा महोत्सवात या कलाप्रकारांचे सादरीकरण
सकाळी ८ ते १० – नोंदणी, १० ते दुपारी १२- उद्घाटन समारंभ, दुपारी १२.१५ ते १२.४५- संघ व्यवस्थापक बैठक
दुपारी १ ते सायं. ४- लावणी, दु. १ ते रात्री १०- समूहगायन (भारतीय), दु. १ ते दु. ३.३०- कातरकाम, दु १ ते सायं. ४-मूक अभिनय, दु १ ते २ -प्रश्नमंजुषा लेखी, दु. 2 ते ५-वक्तृत्व मराठी, दु. ४ ते सायं. ७- भारुड, दु ४ ते सायं. ६.३०-भित्तीचित्रण, सायं. ५ ते रा. १०- काव्यवाचन, सायं. ६ ते रा. १०- एकांकिका, सायं. ७ ते रा. ९.३०- मेहंदी, सायं. ७ ते १०- भजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली. मुख्य रंगमंचासह सर्व सभागृह, कक्ष तसेच बैठक व्यवस्था पूर्णपणे सज्ज झाली आहे.
लॉटस तयार सहभागी महाविद्यालयांचे लॉटस तयार करण्यात आले असून त्याबाबत महाविद्यालयांना युवा महोत्सव प्रांगणात सविस्तर सूचना मिळतील. लॉटसनुसारच स्पर्धा घेण्यात येतील. सादरीकरण व सहभागाचे नियोजन लॉटसनुसारच काटेकोर राबवण्यात येतील. दिलेल्या वेळेतच सादरीकरण करण्याची सूचना संघ व्यवस्थापकांना देण्यात आली आहे.
Post Views: 4