बार्शी – क्रीडा युवक संचलनालय पूणे व कळंब तालुका क्रीडा कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२६-२७
या शैक्षणिक वर्षात शालेय तालूका स्तरीय रनिंग स्पर्धा २६ सप्टेंबर रोजी कळंब येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी व ज्ञानोद्योग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, येरमाळा, ता.कळंब, जि.धाराशिवचा विद्यार्थी चि.पृथ्वीराज गणेश रोडे याने दमदार कामगिरी करत १७ वर्षांखालील मैदानी स्पर्धेत १५०० मीटर व ३००० मीटर रनिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं.
पृथ्वीराज ने स्पर्धेदरम्यान आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. त्याच्या या सातत्यपूर्ण सरावाचे आणि मेहनतीचे फळ म्हणून प्रथम क्रमांक पटकावत त्याची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली.
पृथ्वीराजला संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव, उपाध्यक्ष – गणेश रोडे, सचिव सौ. सविता जाधव, रविंद्र जगदाळे, सौ.स्नेहल रोडे, प्राचार्य डी.बी मोरे, क्रीडाशिक्षक बापूराव चांदणे, व संदीप पेचगुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या व प्रशिक्षक तसेच पालकांनच्यावतीने संचिती जाधव, अतुल जाधव सर, विश्वजीत जाधव, सचिन कदम, विकास शेटे राहूल कदम, अतुल राऊत, अशोक सांगळे, सचिन मुंढे, उदयकुमार दुधाने, प्रल्हाद गायकवाड,कैलास पाटील, परमेश्वर आगवणे,रितेश जानराव सर , यशराज रोडे या सर्व प्रशिक्षकांनी व पालकांनी पृथ्वीराजचे अभिनंदन केले व पुढील त्यास जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 6