अक्कलकोट : डॉ. कल्याणी निलेश पाटील यांनी सहकुटुंब येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी अनूप गुरुजी यांच्या हस्ते पाटील परिवारास स्वामींची प्रतिमा भेट देण्यात आली.
या भेटीच्या निमित्ताने पाटील परिवाराच्या वतीने व शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील काटरे यांच्या तर्फ़े अक्कलकोट येथील मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन व अल्पोपहाराचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाबद्दल पाटील परिवाराच्या वतीने सुनील काटरे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय घांटे, भाजप अध्यक्ष शिवशरण जोजन ,
सुहास काटरे, नंदकुमार जगदाळे यांच्यासह पाटील परिवार व इतर मान्यवर उपस्थित होते. भक्तिमय आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Post Views: 9