सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने व सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या सहकार्याने आयोजीत १४ वर्षाखालील शालेय शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात अतिशय चुरशीने झालेल्या स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूलच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त वेदांत मुसळे याने उत्कृष्ट खेळत आठव्या फेरीअखेर साडेसात गुण व मुलींच्या गटात एस.आर. चंडक हायस्कूलच्या आदिती इनानी हिने दमदार खेळ करत सातपैकी साडेसहा गुणांसह जेतेपद पटकाविले.
पार्क स्टेडीयम येथील जिमखाना हॉल येथे संपन्न झालेल्या १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत विघ्नेश कोगनोळे (सेंट थॉमस इंग्लिश मिडीयम स्कूल), विहान कोंगारी (श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल), देवदत्त पटवर्धन (आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल), श्रेयस कुदळे (व्हि. एम. मेहता हायस्कूल) यांचे प्रत्येकी सात गुण झाल्यामुळे टायब्रेकमध्ये सरस बुचोल्स गुणपद्धतीवर अनुक्रमे द्वितीय ते पाचवा क्रमांक प्राप्त केला. तसेच मुलींच्या गटात यांनी संस्कृती लव्हाळे (उमाबाई श्राविका हायस्कूल), श्रुती बनसोडे (उमाबाई श्राविका हायस्कूल), दिविजा नादरगी (सेंट थॉमस इंग्लिश मिडीयम स्कूल), अशीमा रचा (सुयश सेंट्रल स्कूल) यांचे देखील प्रत्येकी सहा गुण व सरस बुचोल्स गुणांवर अनुक्रमे द्वितीय, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवत आपले संघातील स्थान निश्चित केले.
स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या खेळाडूंची निवड पुणे येथे दिनांक ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झालेली आहे. यावेळी मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख, संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड व प्रथमेश हिरापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे यांनी तर विजय पंगुडवाले, युवराज पोगुल, भरत वडीशेरला, क्रीडा शिक्षक सुभाष उपासे, प्रज्वल कोरे, सागर जमादार, रिद्धी उपासे, नवीना वडीशेरला आकाश चव्हाण आदींनी यशस्वीरीत्या काम पाहिले.
——–
Post Views: 11