सांगोला – माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कै.लक्ष्मीबाई केळकर सभागृह, केळकर हॉस्पिटल आवार, सांगोला येथे संस्थेच्या अध्यक्षा प्रा.निलिमा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रारंभी अश्विनी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव वसुंधरा कुलकर्णी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सन २०२५-२६ चा जमा-खर्च खजिनदार शालिनी कुलकर्णी यांनी सांगितला. वार्षिक अहवाल प्रा.निलिमा कुलकर्णी यांनी मांडला. वर्षभरातील ठळक घडामोडींची माहिती सदस्य संपदा दौंडे यांनी दिली. देणगीदार डॉ.गीता ठाकूर यांच्या संस्थेच्या योगदानाबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. शेवटी विविध विषयांवर चर्चा होऊन संस्थेच्या आगामी कार्याचा आढावा घेण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
Post Views: 12