अक्कलकोट : येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प “मर्मबंधातील ठेव” प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशपयन यांच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, “नमो विश्वरूपा, नमो एकदंता” गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय यासह भावगीते, भक्ती गीते लावणी व चित्रपट गीतांनी रसिकांची मने जिंकली. रसिक श्रोत्याची सांज अविस्मरणीय ठरली .
प्रारंभी श्री स्वामी समर्थ व श्री गणेश प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन रामचंद्र आलुरे, उद्योजक सुनील गोरे, डॉ. विपुल शहा, ॲड. हर्षवर्धन एखंडे, माजी प्राचार्य बसवराज वेळापूरकर व गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशपयन यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रस्तावना व सूत्रसंचालन खंडेराव घाटगे यांनी केले.
यावेळी प्रथमेश लघाटे यांचा सत्कार शिवशरण जोजन, मुग्धा वैशपयन यांचा सत्कार रूपाली येणेगुर, पकवादक मिलिंद यांचा सत्कार निरंजन शहा, शिवाजी सुतार यांचा सत्कार शिवशरण जोजन, विक्रम परीट यांचा सत्कार चंद्रकांत दसले व निवेदक अभिषेक कुलकर्णी यांचा सत्कार शिवशरण जोजन
यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन,अक्कलकोट येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, मल्लिनाथ स्वामी, एम बी पाटील, भीमराव साठे, गौरीशंकर मजगे, गौरीशंकर चनशेट्टी, बाबुराव रामदेव, रवींद्र जोशी, प्रशांत केसकर, नितीन पाटील, संजय हारकुड, प्रकाश घीवारे, नीलकंठ कापसे, राजकुमार नागुरे, धनंजय जोजन, अनिल करजगी आदीसह महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे संयोजक जेष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी, अशोक येणगुरे, मनोज कल्याणशेट्टी, मल्लिनाथ मसुती, संतोष जिरोळे, चंद्रकांत दसले, गुरुपादप्पा आळगी आदीसह पदाधिकारी प्रयत्नशील होते.