मंगळवेढा – तू मला फोन का करत नाही? तू स्वत:ला लय शाहणी समजतेस काय? असे म्हणत एका 30 वर्षीय महिलेस जवळ ओढून तिच्या शरीराशी झोंबाझोंबी करुन तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी पप्पू विठ्ठल बेदरे (रा.बठाण) याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 30 वर्षीय महिला दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.45 वाजता तिच्या शेतातील मकेला पाणी देत असताना तेथे आरोपीने येवून पिडीतेस तू मला फोन का करत नाही? तू स्वत:ला लय शाहणी समजते काय व भाव खाते काय असे म्हणून तिला जवळ ओढून अंगाशी झोंबाझोंबी करुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन शेवरीच्या झाडाच्या ओल्या लाकडाने फिर्यादीच्या पाठीवर मारुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. बी.एन.एस.74,75(2),118(1),352,351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
Post Views: 9