सांगोला – सांगोल्यातील फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक येथे ई-सेलच्या वतीने प्रोजेक्ट स्पार्क २ के २६ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समस्या ओळखा-कल्पना करा-उपाय शोधा-प्रकल्प तयार करा-उद्योगाची संधी निर्माण करा या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव दिला. याची पाहणी प्रा.अक्षय रुपनर, डॉ.आशिष जोशी, प्रा.प्रसाद कुलकर्णी यांनी केली. या कार्यक्रमास ई-सेल टीम लीडर अवधूत मोरे, फॅकल्टी ॲडव्हायझर
प्रा.श्रीराम पतंगे यांचे मार्गदर्शन, यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उत्कृष्ट प्रकल्पामध्ये स्वप्नदीप जगदाळे प्रथम, बनसिद्ध बंडगर द्वितीय, समृद्धी डोके हिने तृतीय क्रमांक पटकावला.
Post Views: 17