सांगोला – डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांनी तृतीय वर्ष बी.फार्मसी वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या अंतिम सत्र परीक्षेत सह्याद्री फार्मसी कॉलेज, मेथवडे (ता.सांगोला) येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कचरे साक्षी प्रकाश व खटकाळे प्रतीक्षा अशोक-प्रथम, यादव समृद्धी रविराज-द्वितीय, व्हनमाने अश्विनी हनुमंत हिने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी सत्कार करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कॉलेजमधील अनुभवी, तज्ञ प्राध्यापक वृंद व त्यांचे मार्गदर्शन, कॉलेजने आयोजित केलेले मार्गदर्शनपर व्याख्याने, सुसज्य ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम याची आम्हाला परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत झाल्याचे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.
Post Views: 18