सांगोला – महिम (ता.सांगोला) येथील श्री गुरुदत्त सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादक सभासदांचा रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गाईचे १ लाख १६ हजार १६० लिटर दूध पुरवठा करणारे संजय नारनवर प्रथम (बक्षीस ५१ हजार रु), ९१ हजार ३९४ लि. सदाशिव घोगरे द्वितीय (४१ हजार रु), ८५ हजार ८११ लि. बिरा कारंडे तृतीय (३१ हजार रु), ७९ हजार २९१ लि. रघुनाथ कारंडे चौथा (२१ हजार रु), ७३ हजार १७ लि. संभाजी घोगरे पाचवा (११ हजार रु) तसेच म्हैसचे १९ हजार २४९ लिटर दूध पुरवठा करणारे संतोष रुपनर प्रथम (३० हजार रु), १६ हजार ४४७ लि. स्वप्निल व्हरगर द्वितीय(२४ हजार रु), ७ हजार ८६४ लि. आबासाहेब झुरळे तृतीय (१६ हजार रु), ७ हजार २२६ लि. संभाजी घोगरे चौथा (१२ हजार रु), ५ हजार ६९३ लि. दादासाहेब घोगरे यांनी पाचवा (६ हजार रु) क्रमांक पटकावला. सभेला संतोष चौगुले, प्रमिला चौगुले, रघुनाथ कारंडे, शंकर चौगुले, बिभीषण पाटील, सोमनाथ पाटील, दीपक भुसनर, सुरेश झुरळे, विकास कारंडे, विजय मरगर, अंकुश चौगुले, बाळासाहेब बंडगर यांच्यासह दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.