सोलापूर – गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला अबरार वाहिद रंगरेज( वय-२५ वर्षे, रा. ३२४, शनिवार पेठ, भारतीय चौक, सोलापूर) यास सोलापूर शहर व उर्वरित जिल्ह्यातून २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
आरोपी रंगरेज याविरुद्ध सन २०२३,२०२५ व २०२६ या कालावधीमध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर यांनी कार्यवाही करुन ६ ऑक्टोबर रोजी अबरार रंगरेज सोलापूर यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून २ वर्षाकरीता तडीपार केले आहे.