अक्कलकोट – अक्कलकोट येथील ऐतिहासिक कारंजा चौक नवरात्र महोत्सव मंडळाने यावर्षी भव्य असे बद्रीनाथ मंदिर चा हुबेहूब देखावा सादर करणारअसल्याची माहिती अध्यक्ष सुधीर माळशेट्टी यांनी दिली . देखाव्याची जय्यत तयारी चालू असून अंतीम टप्प्यात आहे .रविवारी घटस्थापनेपासून हा देखावा अंबेच्या भक्तानां प्रदर्शनासाठी खुला असणार आहे .
कारंजा चौक नवरात्र महोत्सव मंडळाचे यंदाचे ५२ वे वर्ष आहे .या मंडळाची स्थापना १९ ७४ साली संस्थापक कै . .सिद्रामप्पा माळशेट्टी यांनी केली आहे .अनेक सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे नवरात्र उत्सवात करण्यात येतात . .वृक्षारोपण ‘आरोग्य तपासणी शिबिर ,गरजू महिलांना साडी वाटप ,उपवासाचे साहित्य वाटप , घटस्थापने दिवशी घट साहित्य वाटप , गुणवंतांचा सत्कार ‘असे विविध उपक्रम राबविले जातात असे अध्यक्ष सुधिर माळशेट्टी यांनी स्पष्ठ केले .
महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणात केला जातो .लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी कठपुतली चा खेळ हे विशेष आकर्षण असते . . गेली ५२ वर्षां पासून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबविले . विविध आकर्षक देखावे विद्युत रोषणाई सादर. करणारे मंडळ अशी या मंडळाची ख्याती आहे . दुर्गा मातेस नवरात्र मध्ये विविध रूप देऊन आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत असते . नऊ दिवसात नऊ रुपे दुर्गा मातेस करण्यात येतात .
सर्व धर्मीय लोक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात . .पहाटे पाच वाजता आभिषेक करून भाविकांना दर्शनासाठी सोडले जाते यदांचे बद्रीनाथ धाम मंदिर हे आतापर्यंतचा केलेल्या सर्व देखाव्या मध्ये यंदाचा मोठा देखावा आहे असे कार्याध्यक्ष केदार सुधीर माळशेट्टी यांनी सांगितले . देखावा आरास व दुर्गा मातेच्या दर्शना चा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीने केले आहे . गेली ५२ वर्षापासून माळशेट्टी परिवार सर्व कुंटुंब
तन मन धनाने दुर्गा मातेच्या सेवेत समर्पित भावनेने सेवा करीत आहे .
Post Views: 13