मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर युनिट-०३ च्या १३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. भैरवनाथ शुगरचे मार्गदर्शक शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते बॉयलर पूजन करण्यात आले, तर भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या शुभहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुहास जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी अरुणा यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. ऊस वजन काटा पूजन तसेच उसाने भरलेल्या वाहनांचे विधिवत पूजन पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे व नाथा काशिद यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीपती माने व त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रप्रभा यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले.
यावेळी भैरवनाथ शुगरचे मार्गदर्शक शिवाजीराव सावंत म्हणाले की, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने उसाचे क्षेत्र कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तरी नोंद केलेला सर्व ऊस वेळेत गाळपासाठी आणण्यात येईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेच्या बळावर कारखान्याने गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत, त्याच विश्वासाच्या बळावर चालू गळीत हंगामही यशस्वीपणे पूर्ण केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी आवश्यक असलेली ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचेही त्यांनी सांगितले.
भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक तथा माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांनी यंदाच्या हंगामासाठी तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील असून, दिलेले उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला भैरवनाथ शुगरचे मार्गदर्शक शिवाजीराव सावंत, चेअरमन अनिल सावंत, रतनचंद बँकेचे चेअरमन राहुल शहा, किसन गवळी, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन विक्रम सावंत, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, आप्पासाहेब माने, सुधीर धुमाळ, दौलत माने, प्रतीक किल्लेदार, प्रशांत शिंदे, संतोष रंधवे, बंडू जाधव, जमीर इनामदार, सुदर्शन कसबे, नाथा काशिद, अमर सूर्यवंशी, श्याम गोगाव, संदीप तापडिया, समाधान जाधव, तानाजी चव्हाण, चंद्रकांत देवकर, गुरुनाथ टिगळे, गणपत गाढवे, राजकुमार स्वामी, तानाजी इंगळे, नागेश लिगाडे, संतोष नागणे, भारत निकम व कृष्णा निकम उपस्थित होते.
तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, चीफ अकाउंटंट देवानंद पासले, एचआर मॅनेजर संजय राठोड, केनयार्ड सुपरवायझर योगेश राहिगुडे, इलेक्ट्रिक इंजिनिअर संतोष माळी, स्टोअरकीपर केदार साबणे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, ऊस उत्पादक शेतकरी तसेच ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
Post Views: 10