पिलीव – सोलापूर जिल्ह्यात यंदा भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या ऊस किंवा इतर जी पिके शेतात आहेत ती वाचविणे मोठे आव्हान आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे ऊसाची वाढ प्रचंड खुंटली आहे यामुळेच उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. महाराष्ट्र शासन यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरु करण्याच्या तयारीत आहे. माञ सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी गतवर्षीच्या गळीत हंगामातील दुसरा हप्ता दिला नाहीच. तर यंदाच्या गळीत हंगामात नक्की ऊसाला दर किती देणार याविषयी ब्र शब्दही काढला नाही. दरवर्षीच्या तुलनेत बाजारात साखरेला सध्या उच्चांकी दर आहे यामुळेच शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर मिळणे अपेक्षित आहे.ऊसाचे घटलेले क्षेत्र पाहता यंदा साखरेची टंचाई जाणवण्याची चिन्ह आहे हे टाळण्यासाठी शासन हंगाम लवकर सुरु करण्याच्या तयारीत आहे. माञ पाऊस नसल्यामुळे अद्यापपर्यंत ऊस अपरिपक्व आहेच पण तो ऊस पाणी नसल्यामुळे टिकवायची कसा असा दुहेरी संकटात शेतकरी आहे. तर शेतकरी संघटनांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरु करु नयेत तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा दर जाहीर केल्याशिवाय ऊस देऊ नये तर ऊस वाहतुकदारांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय वाहतुक करु नये असे आवाहन केले आहे अन्यथा आम्ही ऊस वाहतूक करणारी वाहने कारखान्यावर पोहुचुच देणार नसलयाचे जाहीर करीत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. एकीकडे गळीत हंगामाची तयारी यंदाचा गळीत हंगाम जेमतेम साठ ते सत्तर दिवस चालेल अशी अपेक्षा आहे त्यातूनही चाऱ्याची भिषण टंचाई असल्यामुळे यातील ऊस चाऱ्यासाठी ठेवला जाणार आहे. पण चाऱ्यासाठी ठेवलेल्या ऊसाला पाणी कोठुन द्यायचे अशी अडचण शेतकऱ्यांसमोर आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील काही साखर कारखानदारांनी दर न जाहीर करताच गळीत हंगाम सुरु केला आहे पण सध्या शेतकरी संघटनांच्या आक्रमक आंदोलनामुळे कारखाने बंद करण्याची वेळ येणार आहे. सुरु केलेले कारखाने आंदोलनामुळे बंद केल्यामुळे कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूकदार या सर्वांचेच मोठे नुकसान आहे. माञ सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनामुळे दुष्काळात होरपळलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ऊस उत्पादक शेतकरी किती साथ देतात हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असतानाही सोलापूर जिल्ह्यातील ऊस मोठ्याप्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यात गाळपास जातो तरीही जिल्ह्यातील साखर कारखानदार चांगला ऊस दर देत नाहीत. चौकट _ बाजारात साखरेचा भाव पन्नास रुपयांपर्यंत राहीला तरीही कारखानदारांना शेतकर्यांना चार हजार रुपयांपर्यंत दर द्यायला काहीच अडचण नाही कारण कारखान्यातील इतर बायप्राॅडकट याचा विचार केला तर हे बजेट खुप लांबपर्यंत जाते . चौकट _ सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील साखर कारखानदारांनी दर न जाहीर करताच गळीत हंगाम सुरु केला आहे यांविषयी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांना विचारले असता तालुक्यातील प्रस्तावित कारखानदारांनी ऊस दर न जाहीर करताच गळीत हंगाम सुरु केला आहे याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले ही अतिशय दुर्दैवी बाब हा आम्ही शेतकरी संघटना शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून झगडत असताना ऊस दर जाहीर न करणारया कारखानदारांनाच शेतकरी स्वागत करुन मदत करीत असतील तर मग शेतकरी संघटनांनी आंदोलन काय म्हणून करायचे असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला .