अक्कलकोट : हैद्रा येथील ख्वाजा पीर सैफुलमूलक चिस्ती दर्ग्याला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने २० लाख रुपये निधी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने अश्या प्रकारची कसलाही मदत अथवा निधी हैद्रा येथील दर्ग्यास दिलेली नाही. अशी माहिती रविवारी पत्रकारांना दिली आहे.*
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासंदर्भात अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे स्वामीभक्त आणि नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत. याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, हैद्रा दर्गा समितीकडुन सौरऊर्जा प्रकल्पासाठी मदतीची मागणी करण्यात आली होती. मात्र, या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय होण्यापूर्वीच अन्नछत्र मंडळाकडून सौरऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या रकमेची मदत देण्यात येणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यामुळे अनेक स्वामीभक्त आणि नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले.
तरी सर्व स्वामीभक्त, देणगीदार आणि नागरिकांनी सदर या प्रकरणाबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेस न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे उपस्थित होते.
Post Views: 21