सोलापूर – आजाराला कंटाळून एका 35 वर्षीय तरुणाने घरातील लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावात उघडकीस आली.
काशिनाथ शंकर नवगिरे(वय 35 वर्ष, रा. धोत्री ) असे त्या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. काशिनाथ हा मंगळवारी रात्री घरात झोपला होता आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना आढळून आला. ही खबर वळसंग पोलिसांना समजली असता पोलीस हवालदार आर.डी. मालचे व पोलीस हवालदार मांढरे यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह इतरांच्या साह्याने खाली उतरून शव विच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी दाखल केला. मयत काशिनाथ याला टी.बी. आजाराची लागण झाल्यामुळे त्यातच त्याने हे कृत्य केले असावे अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 15