सोलापूर – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि त्यांच्या मागणीनुसार, सोलापूर विभागातील स्थानकांवर कोल्हापूर-कलबुर्गी दसरा-दिवाळी विशेष गाड्यांसाठी अतिरिक्त थांबे देण्यात येत आहेत.
यामध्ये गाडी क्र. ०१४५१ कोल्हापूर-कलबुर्गी विशेष गाडी १४.१०.२०२६ ते १५.११.२०२६ या कालावधीत मंगळवार आणि शुक्रवार वगळून आठवड्यातून ५ दिवस धावेल. या रेल्वे गाडीच्या २४ फेऱ्या होतील तर गाडी क्र. ०१४५२ कलबुर्गी-कोल्हापूर विशेष गाडी १४.१०.२०२६ ते १५.११.२०२६ या कालावधीत मंगळवार आणि शुक्रवार वगळून आठवड्यातून ५ दिवस धावेल. या रेल्वे गाडीच्या २४ फेऱ्या होतील.
माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड असे या रेल्वे गाडीला अतिरिक्त थांबे असतील. विशेष गाडी सेवेबाबतचे इतर तपशील जैसे-थे राहतील.
प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि या वर्षीच्या दसरा-दिवाळी सणानिमित्त उपलब्ध करून दिलेल्या अतिरिक्त थांब्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे.






















