सोलापूर – देवीची ज्योत आणण्यासाठी जाताना दुचाकी घसरून जखमी झालेल्या अनगर येथील दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला.
सचिन दशरथ भोसले (वय 32 वर्ष, रा. नालबंदवाडी, अनगर, ता. मोहोळ) असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे. तो 10 ऑक्टोबर रोजी दुपारी मित्रासोबत गावाहून सातारा जिल्ह्यातील फलटण कडे मांढरादेवीला देवीची ज्योत आणण्यासाठी निघाला होता. वाटेत फलटण जवळ दुचाकी स्लीप होऊन तो व त्याचा मित्र जखमी झाला. त्यामुळे सचिन भोसले याला दोन खाजगी दवाखान्यात उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात भाऊ दीपक याने दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.
चौकट –
मयत सचिन भोसले हा शेती करायचा, तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 15