पंढरपूर- नवरात्र महोत्सवाच्या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे पाचव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस वनदेवी माता पोषाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड मोठा, मोत्याचा तुरा, शिरपेच मोठा दहा लोलक असलेला, शिरपेच मोठा दोन लोलक असलेला, चांदीचा मत्स्य, तोडे जोड, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, मोत्याची कंठी दोन पदरी, इमिटेशन नेकलेस इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
या बरोबरच रुक्मिणी मातेस देखील सोन्याचा मुकुट, सोने मोती चांदवड, चिंचपेटी हिरवी, तोडेजोड, मोठी नथ, मोत्याचा कंठा, पैंजण जोड इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
दरम्यान राधिका मातेस सिद्धेश्वर टोप, पुतळ्यांची माळ, जवेची माळ व सत्यभामादेवीला नक्षी टोप, पुतळ्यांची माळ, जवेची माळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत, तसेच महालक्ष्मी मातेस सोन्याचे गंठण,अष्टपैलू मण्याची कंठी तीन पदरी, साखळ्या जोड, तांदळाहार सात पदरी, लफ्फा, मोत्याची कंठी एक पदरी, चांदीची छत्री इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे.
—————
चौकट: श्री व्यंकटेशास नक्षी टोप प्रभावळीसह, नामनिळाचा, हिऱ्याचे कंगनजोड, दंडपेठ्या जोड, मोत्याची कंटी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मारवाडी पेठयांच्या मोत्यांचा हार, तोरडीजोड, तुळशीची माळ एक पदरी, चांदीची काठी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे.
—————-
चौकट : मंदिर समितीच्या अखत्यारीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगीतले.
Post Views: 9