पंढरपूर – नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर पंढरपूर शहरात यंदा प्रथमच भव्य ना भुतो ना भविष्यति असा’रंगतरंग दांडिया नाईट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा पंढरपूर तालुक्यातील रसिकासाठी आतापर्यत झाली नाही अशी होणार आहे. त्यासाठी पंढरपूर व तालुक्यातील रसिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे. प्रशस्त ग्रांऊड,सुरक्षिततेची, पार्किंगची सोय, ही स्पर्धा फक्त महिला,मुली व कपल साठी असणार आहे.त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महिलासाठीच व कपल साठी राहणार आहे. सदर कार्यक्रम काटेकोर नियम पाळूनच स्पर्धेची सुरूवात होणार आहे.सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ.अपर्णा व श्रीकांत पद्माकर बागल, सौ.नेहा व शिवम दत्ताजीराव पाटील व सौ.भाग्यश्री व श्री.आदर्श ॲलेक्स आकुनुरी हे करणार आहेत.
या दांडिया महोत्सवाचे उद्घाटन दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 6 ते 11 वाजता, डीव्हीपी स्क्वेअर, सरगम चौक, पंढरपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी यश गोल्ड हे स्पास्नर असणार आहेत.पंढरपुरातील प्रसिध्द व्यापारी परंपरा शुध्द सोन्याची व्यापारी असा त्याचा नावलौकिक आहे. त्यास संलग्न असे ग्रीन सह्याद्री, आर व्ही पॅलेस, ह्दयस्पंदन हॉस्पीटल,एस.के.फुडस,आरंभ रेसिडेन्सी, पुजारा मोबाईल,डॉ अमरजित गोडसे, चाईल्ड हुड ब्रदर्स, वरद अर्बन, कदम आयु.चिकित्सालय.अशा नामवंत व्यावसायीकांनी यासाठी सहकार्य केले आहे.
या कार्यक्रमात बक्षिसाची बरसात होणार आहे.स्टार ऑफ नाईट स्कुटी,तर सोलो टी.व्ही, कुलर, ड्रायर तर कपलसाठी गिफ्ट व्हाऊचर,मिक्सर हीटर, व ग्रुप साठी साउंड बॉक्स.ट्राली बॅग,होम थिएटर राहणार आहेेत, तर लहान मुलांसाठी सायकल,स्केटींग,क्लॉथ व्हाऊचर,कलर बॉक्स, स्टडी टेबल राहणार आहेेत.तर बेस्ट ड्रेस साठी व्हाऊचर,पर्स,ड्रायर इ.राहणार आहेत. तरी रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपली तिकीटे बुक करावीत असे आयोजकांनी सुचिवले आहे.
नवरात्रौत्सवानिमित्त शहरातील तरुणाई, महिला आणि रसिकांसाठी पारंपरिक लोककलेला आधुनिकतेची जोड देत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम आणि सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेत आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास पंढरपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘रंगतरंग’ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 10