सोलापूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २९ नोव्हेंबरला मतदान तर ३० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बँकेचा हा निवडणूक कार्यक्रम मंजूर केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी गुरुवारी निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी पुणे सह निबंधक कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानंतर तिथून तो प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे गेला होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता डिसीसी बँक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
सोमवार दिनांक २६ ऑक्टोबर ते शुक्रवार ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले नामांकन पत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल करता येतील. चिन्ह वाटप व अंतिम यादी एकाच दिवशी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केले जातील. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका जाहीर होणार असून त्यातूनच लढत रंगणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
चौकट
असा असेल निवडणूक कार्यक्रम
• उमेदवारी अर्ज दाखल करणे – २६ ऑक्टोबर ते शुक्रवार ३० ऑक्टोबर २०२६
• उमेदवारी अर्जांची छाननी – २ नोव्हेंबर २०२६
• अर्ज माघारीची मुदत – ४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२६
• चिन्ह वाटप व अंतिम यादी – १८ नोव्हेंबर २०२६
• मतदान – २९ नोव्हेंबर
• मतोजणी आणि निकाल – ३० नोव्हेंबर
चौकट
या १९ जागांसाठी रणसंग्राम
• कृषक सेवा सोसायटी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकी सहकारी पेटपेढ्या ( प्रत्येक तालुक्यातून १) – ११
• महिला प्रतिनिधी – २
• अनुसूचित जाती/जमाती – १
• इतर मागासवर्गीय – १
• विमुक्त जाती/भटक्या जमाती – १ जागा
• कृषी पणन व शेती माल प्रकिया संस्था – १
• दूध संस्था / व्यक्ती सभासद – १
• नागरी सहकारी बँका- पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था ( विणकर, मजूर, गृहनिर्माण संस्था वगळून ) – १





















