Tuesday, November 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवाळीच्या आनंदात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत शासनाची पावले

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2026
in mumbai
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

ठाणे – निसर्गाच्या लहरीपणापुढे आणि दुष्काळी छायेखाली जेव्हा शेतकरी राजा हतबल होतो, तेव्हा त्याच्या पाठीशी केवळ मदतीचा हात नव्हे तर कुटुंबासारखी सोबत देणारी प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणा जेव्हा थेट बांधावर येते, तेव्हा तो बळीराजासाठी एक नवा आशेचा किरण ठरतो. यंदाच्या दिवाळीच्या सणात, विशेषतः लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी (ढाढरे) येथे जाऊन आदिवासी व शेतकरी बांधवांसोबत केलेली प्रत्यक्ष भेट आणि संवाद या संवेदनशीलतेची उत्तम प्रचिती देणारा ठरला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्रिमंडळाला आवाहन केले होते की, त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपली दिवाळी शेतकऱ्याबरोबर त्याच्या घरी जाऊन साजरी करावी.या आवाहनाला प्रतिसाद देत वनमंत्री गणेश नाईक यांनी आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील करपटवाडी येथे ही प्रेमाची अन् आस्थेची भेट दिली. यावर्षी संकट कितीही मोठे असले, तरी शासन आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
      या विशेष दौऱ्यात मंत्री गणेश नाईक यांनी केवळ भेट दिली नाही, तर प्रत्यक्ष शेतात उतरून भातशेती, उडीद, नागली आणि खुरासनी या पिकांची पाहणी केली. निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी त्यांनी अत्यंत आत्मीयतेने व जवळून समजून घेतल्या. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात आपापल्या कुटुंबापासून दूर राहून थेट ग्रामीण भागात दाखल झालेल्या मंत्र्यांनी आणि प्रशासनाने शेतकऱ्यांचे दुःख आपलेसे केले. यावेळी ढाढरे ग्रामपंचायतीच्या वतीने वनमंत्र्यांचा अत्यंत उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला, तसेच आदिवासी बांधवांना अन्नधान्याची किट व दिवाळी भेटीचे वाटप करून या सणाला एक वेगळा व मानवीय स्पर्श देण्यात आला.
      याप्रसंगी आयोजित संवाद सभेत बोलताना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शेतकऱ्यांना विश्वास देत स्पष्ट केले की, शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील आणि शेतकरी बांधवांच्या सर्व मागण्या व समस्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवून योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल.
     या दौऱ्यात वनमंत्र्यांसोबत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूरचे वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री.दिपेश मल्होत्रा, गटविकास अधिकारी बी.एच.राठोड, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, किन्हवली चे सहाय्यक उपनिरीक्षक नितीन खैरनार, श्री.सुनील शिंदे, भास्कर जाधव, नगरपंचायत गटनेते विवेक नार्वेकर, राम जागरे, शरद उमवणे, तानाजी पानसरे, सुनील लकडे यांच्यासह शहापूर तालुक्यातील वन विभाग, महसूल विभाग आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावरून शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र आल्याचे उत्तम दर्शन घडले. महाराष्ट्र शासनाने दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी पीक नुकसानीची भरपाई, वेळेत उपलब्ध होणारे थेट अनुदान, आपत्कालीन निधी आणि विविध कृषिपूरक उपायोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाची ही कर्तव्यपरायणता आणि तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचण्याची तयारी हे दाखवून देते की, आजचे शासन केवळ घोषणा करणारे नसून प्रत्यक्ष कृतीतून बळीराजाच्या वेदनांवर फुंकर घालणारे आहे.
     या संपूर्ण दौऱ्याने आणि शासनाच्या दिलासादायक भूमिकेने राज्यातील शेतकरी वर्गामध्ये एक नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. ‘माझा बळीराजा कधीही एकाकी नाही आणि शासन त्याच्या पाठीशी सदैव कटिबद्ध आहे’ हा आश्वासक संदेश या दिवाळीने दिला असून, हा घट्ट विश्वास भविष्यातील अधिक समृद्ध, सुरक्षित आणि बळकट शेतीची पायाभरणी करणारा ठरेल, यात शंका नाही.
Views: 20
Previous Post

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी केली शेतातील पिकांची पाहणी

Next Post

दुष्काळी आपत्तीचा सामना आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दुष्काळी आपत्तीचा सामना आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर

ताज्या बातम्या

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

#diwalispecial #diwali2026 #solapurnews #maharashtra

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1485136

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!