बारामती : दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हल आणि २६ व्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभात शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी श्री. किशोरकुमार शहा यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे प्रमुख उद्घाटक, तर सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील अध्यक्षस्थानी होते.
१८२७ पासून जपलेला विश्वास, प्रामाणिक वाटचाल आणि ग्राहकांशी असलेली आपुलकीची नाती यांचा हा गौरव आहे.
श्री. शहा म्हणाले, “पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी संपत नाही, तर ती आणखी वाढते.” हा सन्मान त्यांनी चंदुकाका सराफ परिवारातील प्रत्येक सदस्याला आणि सर्व ग्राहकांना समर्पित केला.
पुरस्कार : राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, दुधेबावी फेस्टिव्हल
पुरस्कारार्थी : श्री. किशोरकुमार शहा, चेअरमन, चंदुकाका सराफ अँड सन्स, बारामती
Views: 20