सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी बँक) संचालकपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अक्कलकोट येथील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सभागृह नेते सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने श्री श्री श्री सद्गुरू बसवारूढ मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा झाला.
यावेळी अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांनी आमदार कल्याणशेट्टी यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभाशीर्वाद दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेला नवी उभारी मिळावी, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून भक्कम आर्थिक मदत मिळावी आणि जिल्हा बँकेने पुन्हा अव्वल स्थान प्राप्त करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या कार्याचा गौरव केला. संचालकपदाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ते पुढाकार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराव जमादार, युवा नेते संदीप महाले, नितीन शेजुळ, व्यंकटेश ज्याटगल, प्रवीण डोळे, अक्षय पाटील, सिद्धारूढ गदळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
—
Views: 16