मोहाळ – मोहोळ रेल्वे स्थानकावर सिध्देश्वर एक्स्प्रेसला थांबा मिळाला खरा; परंतु मोहोळ येथील रिझव्हेशन काउंटर बंद असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यामुळे तो तातडीने सुरू करावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश काळे आणि भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा मोहोळ चे माजी शहराध्यक्ष अविनाश पांढरे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
मोहोळ रेल्वे स्थानकावर कोरोना पासून फास्ट गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला होता. यासाठी तो मोहोळ मध्ये पूर्ववत चालू करावा व फास्ट गाड्यांना मोहोळ येथे थांबा मिळावा यासाठी बऱ्याच संघटना,नागरिकांनी आंदोलने केली होती. अखेर बऱ्याच कालावधीनंतर सर्वांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा देण्यात आला. यामुळे मोहोळ तालुक्यातील प्रवाशांची मुंबई पुणे दौंड ला जाणे येण्याची सोय झाली. परंतु मोहोळ रेल्वे स्थानकावर रिझर्वेशन करण्याची सुविधा कोरोना कालावधीपासून बंद आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी रिझर्वेशन करण्यासाठीसोलापूर येथे जावे लागते.यामुळे प्रवाशांना त्रास होतो व आवश्यकतेप्रमाणे रिझर्वेशन मिळण्यास विलंब होतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये रेल्वेमध्ये आरक्षण तिकीट असूनही आरक्षण बुकिंग असूनही कन्फर्म सीट नसल्यामुळे ती आरक्षित तिकीट ग्राह्य धरले जात नाही. यामुळे वेगळाच त्रास निर्माण होतो. शिवाय आर्थिक भुर्दंड ही प्रवाशावर पडतो.अशा गोष्टी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोहोळ तालुक्यातील प्रवाशांचा विचार करून मोहोळ रेल्वे स्थानकावर रिझर्वेशन खिडकीची तातडीने सुरु सोय करावी यामुळे किमान प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा मोहोळ तालुक्यातील प्रवाशातून केली जात आहे. या मागणीसाठी एडवोकेट अविनाश काळे आणि अविनाश पांढरे आणि पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे