Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प ; कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद …

राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 16, 2022
in solapur
0
सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प ; कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद …
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने दुपारी दोन वाजेपर्यंत सोलापूर बंद पुकारला आहे. हा बंद शांततेत होईल. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याचा दावा मंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड यांनी केला आहे. दरम्यान आज सकाळपासून सुरु होणारे सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.

या सोलापूर बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, प्रहार संघटना यांच्यासह विविध व्यापारी संघटनाचा या बंदला पाठिंबा आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांचा या बंदला विरोध आहे. दोन्ही बाजूच्या संघटना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दीपाले काळे यांनी बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून बंदचे नियोजन जाणून घेण्यात आले. बंद यशस्वी करण्यासाठी किंवा बंदला विरोध करण्यासाठी कोणत्याही नागरिक आणि व्यापाऱ्यांना बळजबरी करण्यात येऊ नये, अशा पद्धतीच्या सूचना  कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस सतर्क असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 9 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 154 पोलीस अंमलदार, चार राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, 9 जलद प्रतिसाद टीम शहरातील बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत. अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.

शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सकाळी 9 वाजता सम्राट चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होतील. सर्व कार्यकर्ते सुपर मार्केट येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करतील. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, चार हुतात्मा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन रॅलीची समाप्ती होईल. शहरवासीयांनी दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन शिवजन्मोत्सव मंडळाने केले आहे.

दरम्यान या सोलापूर बंदमध्ये भाजप, शिंदे गट आणि मनसे सहभागी होणार नाही. राजकीय द्वेषापोटीच्या सोलापूर बंदला आमचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माध्यमांना दिली. सोलापूर बंदची हाक ही महाविकास आघाडीची आहे त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या नावाचा वापर करुन महाविकास आघाडी राजकारण करत असल्याची टीका देखील जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केली. तसेच सोलापुरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे..

Post Views: 111
Previous Post

कोल्हापुरातल्या हॉटेलमध्ये पोस्टरवरून वाद, हॉटेलमध्ये औरंगजेबाचा फोटो लावल्याचा आरोप…

Next Post

पहा – नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पहा – नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा…

पहा - नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील 'बाळासाहेबांची शिवसेना' विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा...

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886924

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697