Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य योजना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 17, 2023
in maharashtra
0
सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य योजना

Mumbai, India

0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मासेमारी व्यवसायामध्ये मच्छिमारांना विविध साधनसामुग्रीचा उपयोग करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने जाळी, होड्या, बिगर यांत्रिक नौका इत्यादींचा समावेश आहे. भूजल क्षेत्रातील जाळी व होड्या वेगवेगळया पध्दतीच्या असून सागरी क्षेत्रात मात्र बिगर यांत्रिकी नौका व भिन्न प्रकारची जाळी वापरली जातात. त्यामुळे मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य देताना भूजल व सागरी क्षेत्राचा वेगवेगळा विचार करण्यात आला आहे. याबाबतच्या दि.28 सप्टेंबर 2010 च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

या शासन निर्णयामध्ये सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या लहान मच्छिमारांना व रापणकाराना त्यांच्या मत्स्योत्पादनात वाढ व्हावी व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या हेतूने 10 टना पर्यंत बिगर यांत्रिक नौका बांधणीसाठी किंवा अशी तयार नौका खरेदी करण्यासाठी दि.18 नोव्हेंबर 2010 च्या शासन निर्णयान्वये रु. 1 लाख अनुदान देण्यात येत होते.

भूजल व सागरी क्षेत्रातील मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी तयार मासेमारी जाळी खरेदी करता यावी व यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत वाढ व्हावी तसेच भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना बिगर यांत्रिक नौका बांधणीसाठीच्या दि.28 सप्टेंबर 2010 व दि.18 नोव्हेंबर 2010 च्या शासन निर्णयान्वये व सागरी क्षेत्रातील मच्छिमारांना शासन मध्ये नमूद केलेल्या बिगर यांत्रिक नौका बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या व कुशल कारागिराच्या मजुरीच्या दरात 12 वर्षाच्या कालावधीत बरीच वाढ झाल्यामुळे, प्रचलित दराने उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून बिगर यांत्रिक नौका बांधणे शक्य होत नाही. यास्तव जागतिक मत्स्यव्यवसाय दिनानिमित्त सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिक नौका बांधणीच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

त्यानुसार भूजल व सागरी क्षेत्रातील जास्तीत जास्त मच्छिमारांना लाभ देण्याच्या अनुषंगाने मासेमारी साधनावर अर्थसहाय्य देण्याबाबतचा दि.28 सप्टेंबर 2010 व दि.18 नोव्हेंबर 2010 रोजीचा शासन निर्णय अधिक्रमीत करुन सुधारित शासन निर्णय निर्गमीत करण्यास शासनाने पुढीलप्रमाणे मान्यता दिली आहे

अ) सागरी मत्स्यव्यवसाय:- 1) तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान : सागरी क्षेत्रातील मासेमारी नौकांवर वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मोनोफिलामेंट तयार जाळी खरेदीवर 3 टनावरील प्रत्येक मासेमारी नौकेस, प्रती वर्ष 200 कि. ग्रॅ.पर्यंत,3 टनाखालील प्रत्येक मासेमारी नौकेस, प्रती वर्ष 100 ग्रॅ.पर्यंत, रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला रापणीच्या तयार जाळयांवर प्रतिवर्षी 50 कि.ग्रॅ. पर्यंत अनुदान, तयार जाळ्याच्या किमतीच्या 50 टक्के पेक्षा जास्त नाही इतके देय राहील. जाळ्याच्या किमतीची कमाल मर्यादा प्रती कि. ग्रॅ. रु.800/- इतकी राहील, याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

1) बिगर यांत्रिक नौका:- लहान मच्छिमारांना किंवा रापणकारांना 10 टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी/ तयार नौका खरेदी करण्यासाठी सध्याच्या प्रचलित दराने रु.1 लाख पर्यंतच्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये 2 लाख 50 हजार पर्यंत करण्यात आली आहे.

लहान मच्छिमारांना किंवा रापणकारांना 10 टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी/ तयार नौका खरेदी करण्यासाठी प्रकल्प किंमत रु. 5 लक्ष पर्यंत खर्चाच्या 50 टक्के अथवा रु.2 लाख 50 हजार यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील.

ब) भूजल मत्स्यव्यवसाय :- भूजलाशयीन मत्स्यव्यवसायांतर्गत नायलॉन/मोनोफिलॅमेंट तयार जाळी खरेदीवर प्रती सभासद/ वैयक्तिक मच्छीमारास 20 कि. ग्रॅ. पर्यंत, 50 टक्के अनुदान देय राहील, जाळ्याच्या किंमतीची कमाल मर्यादा प्रती कि. ग्रॅ. रु.800/- राहील, याप्रमाणे तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान देय राहील.

अनुज्ञेय अनुदान

1) बिगर यांत्रिक नौका :- भूजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. बिगर यांत्रिक नौकेसाठी पुढीलप्रमाणे अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे.

लाकडी नौकेसाठी रु.60 हजार, प्रकल्प किमतीच्या 50 टक्के अथवा रु. 30 हजार यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील. प्रकल्प किमतीच्या 50 टक्के अथवा रु. 15 हजार यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील. प्रकल्प किमतीच्या 50 टक्के अथवा रु. रु.60 हजार यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देय राहील.

मच्छिमारांच्या साधनांवर अर्थसहाय्य-जाळी खरेदी:-1) लाभार्थी हा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचा सभासद अथवा वैयक्तिक क्रियाशील मच्छिमार असावा. 2 ) मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाना त्यांच्या सभासदांकरिता अनुदान देय असलेले जाळे संघ अन्य/संस्था/जाळी विक्रेत्याकडून खरेदी करण्याची मुभा राहील. परंतु खरेदी केलेले जाळी यांचा विहित पंचनामा संबंधित सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांनी केल्यानंतर व तो पंचनामा सहाय्यक आयुक्त यांनी ग्राह्य धरल्यानंतर अनुदान अनुज्ञेय राहील. 3) जाळी खरेदी स्थानिक मासेमार सहकारी संस्था अथवा जिल्हा मच्छिमार सहकारी संघाकडून अथवा जाळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडून करावी. लाभार्थी संस्थेचा सभासद असल्यास सदर जाळी खरेदीच्या जी.एस.टी.सह पावत्या संबंधीत संस्था/संघाच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडे अनुदान मंजूरीसाठी सादर कराव्यात. 4) जाळी खरेदीच्या जी.एस.टी.सह पावत्या खरेदीच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत जिल्हा कार्यालयास सादर कराव्यात.5) अनुदानाची मंजूर रक्कम जिल्हा कार्यालयाकडून संबधित लाभार्थीस डि.बी.टी.द्वारे अदा करण्यात यावी. 6) क्रियाशील मच्छीमारास एका वर्षामध्ये अनुज्ञेय कमाल मर्यादेत अनुदान देय राहील. एकच व्यक्ती एकाहून अधिक संघातून/ संस्थेतून लाभ घेणार नाही हे पहावयाची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांची राहील. 7) रापणसंघानी आपल्या संघाचे नाव त्या संघातील सदस्यांची नांवे व त्यांचे संपूर्ण पत्ते, दूरध्वनी क्र. भ्रमणध्वनी क्र. दरवर्षी एप्रिल महिन्यात संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना कळविण्यात यावीत. मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयात नोंद झालेल्या संघाना/संस्थांना या योजनेचा फायदा मिळेल. संघातील/संस्थेतील सदस्यांच्या नावात/संख्येत बदल झाल्यास तो बदल झाल्यापासून एक महिन्यात जिल्हा कार्यालयाला कळवावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या वर्षाच्या सुरवातीस कळविलेल्या सभासद संख्येच्या मर्यादेपर्यंतच त्यावर्षी अनुदान देण्यात येईल. रापण संघ/संस्थातील सभासद संख्या, त्यात झालेला बदल याबाबत उपरोक्त अर्थसहाय्याबाबतचा निर्णय सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय देतील. 8) मच्छिमारांनी नौकेसाठी आवश्यक मासेमारी परवाना नौकानोंदणी प्रमाणपत्र, विमापत्र इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.

अर्थसहाय्य मिळण्यासाठी आवश्यक बाबी :- अर्जदारांनी यापूर्वी यांत्रिक नौकांसाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, असल्यास त्याच्या हिश्श्याची अनुदानाची रक्कम परत करावी. तसेच अर्जदाराने मत्स्यव्यवसाय विभागाकडून घेतलेले सर्व कर्ज व्याजासह चुकते केलेले असावे.

अर्थसहाय्य मिळविण्याची पद्धती :- अर्जदाराने आपल्या अर्जाच्या प्रती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे सादर कराव्यात. या अर्जासोबत संस्थेचा सभासद व मच्छिमार असल्यासंबंधीचा संस्थेचा दाखला, नौका बांधणीचा करारनामा, शीड, वल्ही, नांगर, दोर यांच्या जी.एस.टी. नमुद असलेल्या पावत्या ही कागदपत्रे देण्यात यावी. अर्जात नौका व अन्य साधनांसाठी किती रक्कम लागणार आहे व कर्ज कोणत्या बँकेकडून घेणार, याचा तपशील द्यावा.

अर्जदारांच्या अर्जाची संबधित सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, आवक दिनांकानुसार नोंद घेतील. जिल्हा कार्यालय अधिकारी, उपलब्ध निधी, अर्जाचा प्राथम्य क्रम, तसेच तो थकबाकीदार नाही, इत्यादी गोष्टी लक्षात घेवून अर्जदारांची क्रमवारी निश्चित करतील.

यासाठी अटी :- अनुदान प्राप्त बिगर यांत्रिक नौका अनुदान दिल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीत हस्तांतरीत अथवा विकता येणार नाहीत, अनुदानाच्या मर्यादेत मच्छीमारांनी बांधलेल्या/ विकत घेतलेल्या नौकेचे यांत्रिकीकरण करावयाचे झाल्यास त्यासाठी शासनाची परवानगी असेल, भूजल क्षेत्रातील लहान होड्यांची संबंधित जिल्हा कार्यालयातर्फे नोंदणी करण्यात येईल व तसे अभिलेख कार्यालय ठेवतील, नोंदणी क्रमांक सदरहू नौकेवर लिहिल्यानंतर अनुदान अनुज्ञेय राहील.

लाकडी नौका, सरासरी आयुर्मान 15 वर्षे, पत्रा नौका, सरासरी आयुर्मान 5 वर्षे, फायबर नौका, सरासरी आयुर्मान 15 वर्षे या प्रमाणे नौकांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे. नौकेचा आयुर्मान कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी नवीन नौकेसाठी प्रस्ताव सादर करण्यास पात्र राहील. नौकेवर खलाशांच्या संख्येनुसार जीवरक्षक साधने उपलब्ध असणे आवश्यक आहे. मच्छिमारांनी नौकेसाठी आवश्यक मासेमारी परवाना नौका नोंदणी प्रमाणपत्र, विमापत्र इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.

या योजने संबंधी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे अवर सचिव, सं.ज.सवने यांनी दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

मनोज शिवाजी सानप – जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

Post Views: 148
Previous Post

डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन

Next Post

चांद्रयान-3 : प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चांद्रयान-3 : प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे

चांद्रयान-3 : प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे

ताज्या बातम्या

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

 म्हशी उधळल्याच्या कारणावरुन दाम्पत्याला बेदम मारहाण; पत्नीच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर

September 16, 2026

गावठी पिस्टल, चाकू, तलवार आणि कार जप्तप्रकरणी आरोपीचा जामीन मंजूर

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1218978

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!