सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी ते मंद्रुप जाणाऱ्या रोडलगत शेतातील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अनुद्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी जुगारी पळून गेले. मात्र, पोलिसांनी सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.याबाबत पोलिस नाईक शरद ढावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गायकवाड (रा. सेटलमेंट), शिव, अबिद, शरणू (रा. कर्नाटक), शेत मालक महिबूब अल्लाउद्दीन आळमोरे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून पाच लाख ९६ हजार ६३० रुपयांचे जुगाराचे साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने जप्त केली आहे. पोलिस अधीक्षकांना नांदणी ते मंद्रुप जाणाऱ्या रस्त्यावर रोडलगत असलेल्या महिबूब आळमोरे याच्या शेतात पत्राशेडमध्ये कर्नाटक व सोलापुरातील काही लोक मिळून जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून शिंदे व त्यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच जुगार अड्ड्यातील जुगारी रोख रक्कम घेऊन पळून गेले. पोलिस हवालदार आसादे पुढील तपास करीत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...