सोनखेड-(त भा वृत्तसेवा )
2005 मध्ये आंबेसांगवी येथील टोलनाक्या वर दरोडा प्रकरणी एकोणीस वर्षा पासुन फरार असलेला मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथील
आरोपी सुभाष तिक्रम उर्फ टिकाराम राठोड या दरोडेखोरास सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने व त्यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या
दि.23/06/2024 रोजी मा.पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या आदेशाने पोलीस स्टेशनं अभिलेखा वरील पाहिजे फरारी आरोपी अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबवून मागील 19 वर्षापासून फरारी असलेला आरोपी सुभाष तिक्रम उर्फ टिकाराम राठोड वय 38 वर्ष याची गोपनीय माहिती काढून पोलीस ठाणे सोनखेड गुरन 33/2005 कलम 395 भा.द.वी.मध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले आरोपी पकडण्यात सोनखेड पोलीस ठाण्याचे स पो नि माने ,
जमादार दादाराव काळे , पो कॉ रमेश वाघमारे चालक पो हा देवकते पो हा शिंदे, मुदखेड यांनी भूमिका बजावली