सोनखेड -(तभा वृत्तसेवा) सोनखेड येथील प्रति देहू समजले जाणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने दरवर्षी आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या सोबत 23 वर्षांपासून संत तुकाराम महाराज संस्थान ची दिंडी क्रमांक 229 अधिकृत जात असते याही वर्षी सोनखेड येथून टाळ मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा तुकाराम च्या जायघोशात दिंडीचे प्रस्थान दि 25 जुन ला सायंकाळी होत आहे
या पायी सोहळ्यास परिसरातील हजारो वारकरी भाविक सहभागी होत असून या पायी सोहळ्यास जेवण्याची राहण्याची सर्व व्यवस्था पिण्याचे शुद्ध पाणी आरोग्य पथक सह सर्व व्यवस्था संत तुकाराम महाराज संस्थान सोनखेड /पंढरपूर व सर्व गावाच्या वतीने केली जाते पायी दिंडी सोहळ्यास गावातील तरुण मंडळी सेवेत असते या सोहळ्यास अनेक दिगज कीर्तनकार मंडळीचे कीर्तन प्रवचन लाभत असते या सोहळ्यास सर्व परिसरातील भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थान च्या वतीने व दिंडी चालक हभप बळवंत भगवानमहाराज मोरे संयोजक ज्ञानोबा माऊली मोरे अध्यक्ष भगवानराव मोरे उपाध्यक्ष बि डी मोरे सचिव बाबुराव मोरे यांनी केले aahe