मुंबई, २२ जून, (हिं.स) अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कोण होता आरिफ?
आरिफला राष्ट्रीय तपास यंत्रणेने मे २०२२ रोजी अटक केली होती. त्याच्यावर गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता.