सोलापूर , 23 जून (हिं.स.) विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. आलेले भाविक देवाला हार, फुले वाहतात. मंदिर समितीकडे दररोज अंदाजे एक ते दीड टन निर्माल्य जमा होते. यापुढे या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेश कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव महाराज मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.