महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली जात आहे. डिजिटल भारत या अनुषंगाने सर्वत्र ऑनलाईन पेमेंट द्वारे खरेदी विक्री केली जात असताना एसटी महामंडळाने देखील आपल्या प्रणालीमध्ये अद्ययावतपणा आणला आहे ज्या मशीन मधून तिकीट काढले जाते. त्या मशीनमध्ये यूपीआय क्यू आर कोडचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील विविध मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना प्रवास अधिक सुखकर सोयीचा आणि सुट्टे पैशांच्या अडचणी शिवाय सोप्पा होणार आहे. सोलापूर बस स्थानकावर सकाळी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढत असल्याचे चित्र दिसून आले पिंपळगाव नाशिक एसटीबसमध्ये प्रवाशांनी मशीनच्या सहाय्याने ऑनलाईन तिकीट काढल्याचे दिसून आले. या ऑनलाइन पेमेंटमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे असे यावेळी तिकीट काढलेल्या प्रवाशांनी सांगितले. एकंदर एसटी महामंडळाची बस आता हायटेक झाली असून ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढणे दिलासादायक ठरणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...