हिंगोली, 29 जून (हिं.स.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वाधिक 21.20 आणि कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी 3.30 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 13.70(171.90), कळमनुरी 3.30 (139.30), वसमत 11.80 (109.10), औंढा नागनाथ 6.60 (138.70) आणि सेनगांव तालुक्यात 21.20 (130.90) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 12 जून 2024 पर्यत सरासरी 137.80 मिलीमीटर पाऊस पडला आहे.