भोकर(प्रतिनिधी)शहरामध्ये ठिकठिकाणी अवैद्य मटका जूगार पत्याचे क्लब रसायन मिश्रित अवैद्य सिंधी विक्रि होत असल्याने शालेय विद्यार्थी या सिंधीच्सा नादी लागून आयूष्य बर्बाद करुन घेत असल्याने या सर्व अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी सेनेचे पांडूरंग वर्षेवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
भोकर शहरासह तालुक्यात मागील काही दिवसापासून राजकीय वरदहस्तामुळे अवैध धंद्यात जोमाने वाढ झाली असुन रसायन मिश्रित सिंधी गल्लीबोळातून व शाळेच्या परिसरात विक्री होत आहे.अल्पवयीन विद्यार्थी या नशेच्या विळख्यात जखडल्या जात असुन अनेकांच्या आरोग्यावर याचा परिणाम निर्देशनास येत आहे.तसेच गुटखा, मटका व पत्याचे क्लब राजरोसपणे चालत असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत असताना याबाबत पोलीस प्रशासनास माहिती देऊन सुध्दा
कोणतीही कारवाई होत नसल्याने व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह हमरस्त्यावर बेशिस्त वाहतुकीचा त्रास विद्यार्थ्यांसह जनसामान्यांना होत असताना वाहतूक नियंत्रण कर्मचारी केवळ बघ्याची भुमिका बजावत असल्याने नागरीकांच्या समेस्ये बाबत कोणतीही कारवाई प्रशासनातर्फे होत नसल्याने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष केंद्रित करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा १० जुलै पासून अमरण उपोषणाचा इशारा शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर सुभाष नाईक, माधव वडगावकर, साहेबराव भोंबे,रमेश महागावकर,देवड विठ्ठलराव,राजु कवडे,नर्सिंग वर्षेवार आदिसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.