सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक खेळी करत माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील गटाला जोरदार धक्का दिला आहे.
माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकार्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपासोबत राहणार असा शब्द वाघमोडे यांनी दिल्याने मोहिते पाटील, राष्ट्रवादी सह आता हा उत्तम जानकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.