संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार नंदू मोरे यांनी हरकत घेतली होती. धर्यशील मोहिते पाटील यांनी आपले उत्पन्नाचे स्त्रोत उमेदवारी अर्ज सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नसल्याची हरकत होती त्यावर बराच वेळ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांचा समोर सुनावणी झाली.
शेवटी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी सुनावणी नंतर वकील बाहेर आले नंदू मोरे यांचे वकील एडवोकेट उमेश मराठे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, मोरे यांच्या बाजूने आम्ही धैर्यशील मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. धर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले नव्हते परंतु हा विषय कोर्टापुढचा असल्याने आमची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली हा विषय न्यायालयापुढे नेण्याच्या सूचना केल्या पण आम्ही आता न्यायालयात जाणार नाही निवडणूक झाल्यानंतर पुढे पाहू अशी माहिती दिली.