Friday, March 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘लोकसभेला जसं काम केलं, तसंच विधानसभेला करा’; शरद पवारांची बारामतीकरांना साद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 13, 2024
in political
0
‘लोकसभेला जसं काम केलं, तसंच विधानसभेला करा’; शरद पवारांची बारामतीकरांना साद
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

”पुढील चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत जसं तुम्ही काम केलं. तसंच या विधानसभेच्या निवडणुकीतही काम करा. राज्य हातात घेणार.. आणि तुमचं सर्व दुखणं.. दुरुस्त करणे एवढा एक कलमी कार्यक्रम आम्हा लोकांकडून केला जाईल”, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीकरांना दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार मागील तीन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज पवारांनी बारामतीतील शिरसुफळ आणि उंडवडी या जिरायत भागातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, ”जिरायत गावांच्या पाण्यासंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे. हे काम करायला राज्य सरकारला आम्ही भाग पाडू. यासंबंधी मी तुम्हाला आजच शब्द देऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांकडे नाही. मात्र मी निकाल घेतला आहे चार महिन्यांनी निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये मी काही झालं तरी महाराष्ट्राची सत्ता हातात घेणार. सत्ता हातात आल्यानंतर तुमची राहिलेली कामे कशी राहतात हेच मी बघणार”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. ”आज राज्याचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा आणखी कोणी असो या सर्वांचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही”, असेही पवार यावेळी म्हणाले.

 

पवारांच्या दुष्काळी दौऱ्यात युगेंद्र पवारांचाही सहभाग

”बारामती विधानसभेला युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या आणि बारामतीचा दादा बदला”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांच्या नियोजित दुष्काळी दौऱ्यात युगेंद्र पवार यांचा सहभाग अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या जनता दरबारातही शरद पवारांनी अचानक हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बारामतीतून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी शरद पवार करत आहेत. यावेळी त्यांना सगळीकडे हिरवगार झालं आहे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पवार म्हणाले की, ”हे काय हिरवं खरं नाही…हे तात्पुरता आहे. थोडा पाऊस पडला म्हणून हे हिरवं झालं आहे…ही चांगली गोष्ट आहे. मात्र इथं हिरवं करण्यासाठी पाणी दिलं पाहिजे. या दुष्काळाचा आढावा घेऊन मी शासन दरबारी मांडणार आहे. या संदर्भात काही करता आलं तर करा असा आग्रह करणार आहे. काही गोष्टी होतील ही चांगली गोष्ट आहे. ज्या राहतील त्या चार महिन्यानंतर कळवू”, असं आश्वासनही शरद पवारांनी यावेळी केलं आहे.
Post Views: 18
Previous Post

महापालिकेची निवडणूक न झाल्याने लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव नाही – खा.प्रणिती शिंदे

Next Post

नगर : जलतरण तलावातील मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नगर : जलतरण तलावातील मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

नगर : जलतरण तलावातील मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

मे नव्हे मार्च महिन्यातच होतेय उन्हाने घालमेल. #climatechange #viral #public #hightemperature

March 5, 2026

मुख्यमंत्र्यांच्या पसंतीनुसार जाहीर होणार जिल्हा परिषद अध्यक्ष. #public #viral #marathinews

March 5, 2026

ज्येष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे यांना अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर. #public #viral #marathinews #

March 5, 2026

जळोली चौक ते धाकटी वेस रस्त्याचे काँक्रिटीकरण करून पथदिवे बसवण्याची मागणी. #viral #public

March 5, 2026

NMMS परीक्षेत शिवाजी कदम तालुक्यात प्रथम.. #public #viral #marathinews

March 5, 2026

६ महिन्यांपासून संथ कामकाजामुळे सेवेकऱ्यांना नाहक त्रास. #swamisamarth #public #video #vairal

March 5, 2026

येलदरी पुलावर पिकप कोसळली; एका युवकाचा मृत्यू. #acsident #viral #public

March 5, 2026

जळोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वार्षिक तपासणी.. #public #marathinews #solapurnews #viral

March 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0716672

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697