Wednesday, February 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अखेर सिंहाच्या जोडीसाठी नवीन नावांचा प्रस्ताव

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 18, 2024
in india
0
अखेर सिंहाच्या जोडीसाठी नवीन नावांचा प्रस्ताव

Representational image | via Commons

0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील सफारी पार्कमधील सिंह-सिंहीणीच्या जोडीसाठी नवीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. यापूर्वी त्यांना खोडसाळपणे अकबर आणि सीता अशी नावे देण्यात आली होती. याविरोधात विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नावे बदलण्याची मागणी केली होती. दरम्यान, कोर्टाने वादग्रस्त नावे टाळावीत असे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण राज्य सरकारने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवले असून त्यांनी नवीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे.

 

सिंह आणि सिंहिणी अकबर आणि सीता यांच्या नावावरून वाद झाल्यानंतर आता त्यांना नवी ओळख देण्याची तयारी सुरू आहे. नवीन प्रस्तावानुसार सिंहाचे नाव सूरज आणि सिंहीणीचे नाव तनया असू शकते. मात्र, ही नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. नावांचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. विश्व हिंदू परिषदेने (विहिप) सिंहिणी सीतेच्या नावावर आक्षेप घेतला होता. ल्या 12 फेब्रुवारी रोजी सिलीगुडी येथील बंगाल सफारीमध्ये सिंह सिंहिणीला आणण्यात आले होते. हे एका बदली कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आले. नावांवरील वादानंतर राज्य सरकारने त्रिपुरामध्ये नावे ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. यानंतर त्रिपुराचे वन अधिकारी प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले. विश्व हिंदू परिषेदेणे या नावावर आक्षेप घेतल्यानंतरत हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्याचे आदेश दिले होते. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला होता. विहिंपने याला भावना दुखावणारे कृत्य म्हटले होते. कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या महाधिवक्त्यांना विचारले की, एखाद्या प्राण्याचे नाव देव, पौराणिक नायक, स्वातंत्र्यसैनिक किंवा नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावावर ठेवता येईल का ? असा मलाच प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल हे कल्याणकारी अन् धर्मनिरपेक्ष राज्य आहे. सीता आणि अकबराला सिंहाचे नाव देऊन वाद का निर्माण करताय? हा वाद टाळायला हवा होता, असंही न्यायमूर्ती म्हणाले. केवळ सीताच नाही तर मी कोणत्याही सिंहाला अकबर असे नाव देण्याचे समर्थन करीत नाही असेही न्यायमूर्तींनी अधोरेखित केले होते.

Post Views: 45
Previous Post

पं. बंगालमध्ये रामनवमीला उसळली दंगल

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल ; नाना पटोले सह हे नेते सोबत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल ; नाना पटोले सह हे नेते सोबत

आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल ; नाना पटोले सह हे नेते सोबत

ताज्या बातम्या

सिद्धेश्वर तलावातील मृत मासे प्रकरण – महापौरानी घेतला आढावा.. #solapurnews #siddheshwartemple

February 25, 2026

200 रुपयात मोजा आता पोट हिश्याची जमीन.#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews

February 25, 2026

तिरुपती विमान सेवा पुढे ढकलली. #public #aeroplane #tirupati #solapurnews #viral

February 25, 2026

मध्य रेल्वेच्या आरपीएफने चोरांच्या आवळल्या मुसक्या.#public #indianrailways #rpf #viral

February 25, 2026

कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेसला एसीचा डबा वाढला. #railway #indianrailways #viral

February 25, 2026

पंतप्रधानांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन. #solapur #solapurnews #tranding #narendramodi #congress

February 25, 2026

माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा.. #public #maharashtranews

February 25, 2026

मुख्यमंत्री म्हणाले..जो पर्यत वाचत राहीन.#public #viral #tarunbharatnews #marathinews #breakingnews

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0702551

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697