Thursday, October 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन, दीर्घ आजाराने वयाच्या ७६व्या वर्षी मालवली प्राणज्योत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 4, 2024
in maharashtra
0
माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन, दीर्घ आजाराने वयाच्या ७६व्या वर्षी मालवली प्राणज्योत
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : माजी परिवहन राज्यमंत्री आणि पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर सुखदेव गाडे (वय ७६) यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पीरबाजार येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (५ मे) सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धात, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

भारतीय दलित पँथरचे आधारवड आणि पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. विद्यापीठ नामांतर आंदोलनात गाडे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १९९९ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळात गाडे परिवहन राज्यमंत्री होते. विद्यार्थी चळवळीतून गाडे यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. मिलिंद महाविद्यालयात शिकताना आंबेडकरी चळवळीत त्यांची वैचारिक जडणघडण झाली होती. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर त्यांनी ‘रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन’द्वारे आक्रमक आंदोलन केले होते.

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली गाडे यांनी भारतीय दलित पँथरची पुनर्स्थापना केली होती. कवठाळ (जि. अमरावती) येथून आलेल्या गाडे यांनी मराठवाड्यातील दलित चळवळीला दिशा दिली होती. पँथर पॉवर कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे संघटन उभारले होते. शिक्षण संस्था आणि सामाजिक उपक्रमातून गंगाधर गाडे यांनी वंचित वर्गासाठी भरीव काम केले. अभ्यासू नेते आणि फर्डे वक्ते अशी गाडे यांची ख्याती होती.

दरम्यान, गाडे यांचे पार्थिव पीरबाजार येथील नागसेन विद्यालयात रविवारी दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यापूर्वी सकाळी आठ ते दहा या वेळेत विद्यापीठ गेट येथे अंत्यदर्शन घेण्यात येईल. विद्यार्थी संघटना, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आंबेडकरी अनुयायी अभिवादन करणार आहेत, असे सचिन निकम यांनी सांगितले.

झोपडपट्टीधारकांना आधार

खेड्यातून शहरात आलेल्या गरिबांना गंगाधर गाडे यांनी आधार दिला होता. ‘पँथरच्या दृष्टीने झोपडपट्टीचा प्रश्न महत्त्वाचा होता. मोलमजुरी करुन पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांना झोपड्यांनी आधार दिला. या प्रश्नावर पँथरने उभारलेले आंदोलन विधायक काम होते. या आंदोलनास जोडूनच अन्याय, अत्याचार, रुढी, परंपरा यांच्याविरुद्धही संघर्ष करावा लागला’, अशी आठवण गंगाधर गाडे यांनी ‘मराठवाड्यातील आंदोलने’ या पुस्तकासाठी अॅड. विष्णू ढोबळे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.

Post Views: 182
Previous Post

Live | पंढरपूर | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मा. नितीन गडकरीजी यांची जाहीर सभा

Next Post

नितीनजी गडकरी यांनी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, दहिवडी येथे माढा आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नितीनजी गडकरी यांनी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, दहिवडी येथे माढा आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले.

नितीनजी गडकरी यांनी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, दहिवडी येथे माढा आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले.

ताज्या बातम्या

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

September 30, 2026
कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

September 30, 2026

वाड्यावस्त्यांवरील शाळा-अंगणवाड्यांना ‘जनसुविधा’चा आधार

September 30, 2026
मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

September 30, 2026
लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

September 30, 2026
जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

September 30, 2026

सिरोसिसमधील काही बदल अंशतः पूर्ववत होऊ शकतात

September 30, 2026
न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

September 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1282298

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!