गुढी पाडवा झाल्यानंतर कोकणातल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डात आंब्याची आवक होत होती. सध्या मागील आठड्याच्यातुलनेत या फळ बाजारात आंब्यांची आवक कमी प्रमाणात झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे.दरम्यान मागच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे डझनामागे ३०० ते ५०० रुपयांनी उतरले आहेत. मागच्या आठदिवसांत झालेले ढगाळ वातावरण, तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले असल्याने सामान्यांना ही सध्या आंबा खाता येत आहे. ५ डझनाच्या पेटीचा भाव २ ते २ हजार ५०० रुपयांच्या वरून भाव १२०० ते २२०० रुपये पेटीपर्यंत खाली आला. त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांना चांगलीच संधी आली आहे. मात्र अक्षयतृतीय निमित्ताने भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आठ दिवसांत झालेले ढगाळ वातावरण, तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. मात्र जिल्ह्यात निवडणूक वातावरणामुळे आंब्याच्या मागणीला जोरदार फटका बसला असून भाव कमी झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...