शाम शिंदे असे दंड झालेल्या वाहनधारकाचे नाव आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शाम शिंदे हा स्वतःची दुचाकी (एम.एच. १३, सीएम १५०५) वरून भरधाव वेगात जात असताना शहर उत्तरचे वाहतूक पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल संदीप शिंदे यांनी त्यास पाहिले. पाहिल्यानंतर तत्काळ संदीप शिंदे यांनी मोबाइलवर बोलत बोलत जात असल्याबाबतचा फोटो काढला. त्यानंतर त्यास १० हजार रुपयांचा दंड केला. शाम कदम या दुचाकीस्वारास पहिल्या वेळेत मोबाइलवर बोलल्याप्रकरणी १ हजाराचा दंड केला होता, आता दुसऱ्यांदा मोबाइलवर बोलल्याप्रकरणी त्यास १० हजारांचा दंड केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. दरम्यान दंडाची रक्कम लोकन्यायालय अदालतीत भरण्यात आली. वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक नियम न पाळणाऱ्याविरोधात कडक कारवाई वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात येत आहे. शहरातील विविध चौकात, नगरात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हातातील मोबाईलच्या मदतीने गाडीचे नंबर स्कॅन करून दंडाची प्रक्रिया सुरू करण्यात आली तर ग्रामीण भागात हेल्मेट नसणाऱ्या विरोधात मोहिम घेतली आहे. ९ डिसेंबर २०२३ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत ३८० चलनातून २ लाख ९० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...