स्मार्ट सोलापूर शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढलेला दिसत आहे. शहरातील प्रत्येक भागामध्ये मोकाट जनावरे बिनधास्त फिरताना किंवा उभे राहिलेले दिसतात. अशा परिस्थितीमध्ये अपघाताचा धोका संभवतो आहे. शुक्रवारी दुपारी तुळजापूर रोडवर अशीच दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या मधोमध एक घोडा आल्याने अपघात होऊन घोडा जागीच ठार झाला तर कारचा चुराडा झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे शहरातील राजेंद्र चौक बस डेपो या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध उभे राहिलेले दिसून येतात. आशा वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघाताचा धोका संभवत आहे. याकडे महापालिका प्रशासन तसेच कोंडवाडा विभाग अधिकाऱ्यांनी कर्मचारी लक्ष देणे गरजेचे बनलेले आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...